यशवन्त ब्रह्म - लेख सूची

प्राणदाता लुई पाश्चर

काही माणसे मानवजातीच्या कल्याणासाठीच जन्मतात आणि आयुष्यभर त्याच एकमेव ध्येयासाठी कष्ट करीत असतात. लुई पाश्चर त्यांच्यापैकीच एक. ज्यावेळेला रेल्वे गाड्या प्रवाशांना वेगाने एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत पोहोचवत होत्या, तारायंत्रे जलद गतीने संदेश पोहचवत होती, वैज्ञानिक किरणोत्सर्गाने अणूपेक्षाही लहान कणांचा शोध घेत होते, त्यावेळेला त्यांच्या तुलनेत वैद्यकशास्त्रात अजूनही अंधारयुगच होते. बालमृत्यूचे प्रमाणही फार मोठे होते. सुखवस्तू …

लिओनार्डो डा व्हिन्ची

सध्या लिओनार्डो डा विंची ह्याचे नाव, डॅन ब्राऊन या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या, “डा व्हिन्ची कोड’ या कादंबरीवर निर्मित त्याच नावाच्या चित्रपटातील वादग्रस्त विषयामुळे, बरेच चर्चेत आलेले आहे. लिओनार्डो या इटालियन चित्रकाराची, येशूख्रिस्ताच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित “दि लास्ट सपर’ आणि ‘मोना लिसा’ ही चित्रे इतर चित्रांबरोबर जगभर अतिशय गाजली. परंतु तो जगद्विख्यात चित्रकार होता तसा …

धर्मांतर-ग्रॅहॅम स्टीन्सची हत्या

सांप्रत धर्मांतर हा आपल्या देशांत, कधी नव्हे तो अतिशय वादग्रस्त विषय बनलेला आहे. ओरिसामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या करण्यात आलेल्या हत्या, गुजरातमध्ये अल्पसंख्यक ख्रिस्ती समाजावर आदिवासींकडून झालेले तथाकथित हल्ले, या सर्वांचे मूळ धर्मांतर आहे असे म्हटले जाते. त्यांचे जगभरांत पडसाद उमटले. निरनिराळ्या देशांतील वृत्तपत्रांनी या प्रकरणाला अशी काही प्रसिद्धी दिली की हिंदूधर्माचा सहिष्णुतेचा दावा पोकळ वाटावा. एवढा …

सार्वजनिक स्वच्छता

आगरकरांनी स्नान, पोषाख इत्यादींवर लिहिल्याचे त्यांच्या साहित्यांतून आढळते. परंतु, सार्वजनिक स्वच्छतेवर लिहिल्याचे आढळले नाही. कदाचित् त्यांच्या काळी या विषयावर लिहिण्याची त्यांना आवश्यकता वाटली नसावी. सांप्रत सार्वजनिक स्वच्छतेची स्थिती इतकी चिंताजनक झाली आहे की, त्यावर न बोललेलेच बरे. सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपल्याला इतकी अनास्था आहे की आपण गेंड्याच्या कातडीचे झालो आहोत. सुरत शहरात प्लेगसारख्या महामारीचा उद्भव झाल्यावर …

हवाला-एक कूटप्रश्न

‘हवाला’ या शब्दाने सध्या आपल्या देशात प्रचंड खळबळ माजविली आहे. सुरेन्द्र जैन हवाला एजंट आहेत आणि उद्योगपतीही. त्यांच्या घरावर सी.बी.आय्. ने टाकलेल्याधाडीत एक डायरी सापडली, तिच्यात मोठमोठे राजकीय नेते आणि बडे नोकरशहा यांमा दिलेल्या रकमांच्या नोंदी सापडल्या. त्यामुळे हे राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष संशयाच्या भोवर्यालत सापडले आहेत. सामान्य जनतेच्या मनात या नेत्यांबद्दल नाराजी आणि …